पुणे,दि.३०(punetoday9news):- आपल्या देशात व पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आणि पुणे मनपाच्या प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर अहोरात्र राबविण्यात येत आहेत.यात आपली महत्त्वाची भूमिका समजून परिमंडळ क्र. ४ चे उपायुक्त, संदीप कदम यांनी स्वतःचे मार्च महिन्याचा संपूर्ण पगार ७५,७६७/- पुणे महानगरपालिकेस मदत म्हणून दिला आहे.
प्रशासकीय सर्व पातळ्यांवर, स्तरावर , आघाड्यांवर जरी काम चालु असेल तरी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती, संस्थेच्या वतीने पुणे मनपास वेगवेगळ्या पातळ्यांवर तसेच शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी मदतीचा हात मिळत असतो. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील परिमंडळ क्र. ४ चे मा. उपायुक्त, संदीप कदम यांचे वतीने त्यांचा मार्च महिन्याचे संपूर्ण वेतन र.रु. ७५,७६७/- पुणे महानगरपालिकेस मदत म्हणून मिळाले आहेत.
याप्रसंगी मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. उपायुक्त, संदीप कदम यांच्या सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती, संस्थेच्या वतीने सहकार्य मिळाल्याने प्रशासनास किंवा शासन यंत्रणेस निश्चितच एक प्रकारची उर्जा मिळाली आहे. तसेच आपले सहकार्य व पाठबळ भविष्यातही निश्चित मिळेल याची मला खात्री आहे असे म्हणून मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उपायुक्त, संदीप कदम यांचे अभिनंदन केले.
Comments are closed