पिंपरी, दि. 28( punetoday9news):-  1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीरकण करण्यात येणार होते. कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापी सध्यस्थितीत लसींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जो पर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही.

याबाबत नागरिकांना वेळोवेळी सुचित केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!