रोहित सरदाना आज तकमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत होते . आजतक वरुन दंगल या शोचे अँकरिंग ते करत होते . तर अनेक वर्षांपासून ते झी न्यूजमध्ये वृत्तनिवेदक होते . 2018 मध्ये रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .

नवी दिल्ली,दि.30 (Punetoday9news):-  वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे निधन झाले . रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनानंतर मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे .

पत्रकारांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे . कोरोनाचा संसर्ग झालेल्या रोहित सरदाना यांना आज ( 30 एप्रिल ) सकाळी हृदयविकाराचा झटका आला . त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आले . रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस अगोदर पर्यंत ते लोकांची मदत करत होते . कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन , ऑक्सिजन , बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि सहकार्याचे आवाहन करत होते . इतकेच नाही तर 29 एप्रिललाही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचे आवाहन केले होते . त्याआधी 28 एप्रिल रोजी त्यांनी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!