मनपा कार्यक्षेत्रासाठी निवडक ०३ कोविड लसीकरण केंद्रे- • नवीन भोसरी रुग्णालय
• नवीन जिजामाता रुग्णालय
• प्रेमलोक पार्क दवाखाना.
तर दि .०१/०५/२०२१ रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नसल्याची पत्रकाद्वारे माहिती.
पिंपरी,दि.३०(punetoday9news):- कोविड -१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपायायोजना करण्यात येत आहेत . या उपाययोजनांपैकी नागरिकांचे कोविड -१९ लसीकरण करणे हा महत्वाचा घटक आहे . दि .०१ / ०५ / २०२१ पासून भारत देशामध्ये तसेच सर्व राज्यांमध्ये वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड -१९ लसीकरण करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान , भारत सरकार यांनी जाहीर केलेले आहे . या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे .
यासाठी मनपा कार्यक्षेत्रासाठी ०३ कोविड लसीकरण केंद्रे- नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केद्रांची निवड करण्यात आलेली आहे .
सदर केंद्रावर फक्त पुर्व नोंदणी केलेल्या उपरोक्त वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे . प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुर्व नोंदणी केलेल्या २०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे . यासाठी लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे . नोंदणी नसलेल्या या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. तसेच दि .१ / ०५ / २०२१ रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची देखील नोंद घेण्यात यावी . या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , फक्त नोंदणी केलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी ३ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे . तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed