• पुणे महानगरपालिकेतर्फे नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ व राजीव गांधी रुग्णालय,येरवडा या दोन रुग्णालयातच हि सुविधा उपलब्ध.
• शनिवार दिनांक १ मे २०२१ व रविवार दिनांक २ मे २०२१ रोजी ४५ वर्षापुढील लाभार्थ्यासाठी असलेली पुणे महानगरपालिकेची इतर सर्व लसीकरण केंन्द्रे लस साठा उपलब्ध नसल्याकारणाने बंद राहणार.
पुुणे, दि.३०(punetoday9news):- दि. १ मे २०२१ पासून पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या सुचनेनुसार १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हीड लसीकरण देण्यात येणार असून या लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फ कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ व राजीव गांधी रुग्णालय,येरवडा या दोन रुग्णालयातच हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
लसीकरणाची वेळ हि सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे .यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी साईट सुरु झाल्यानंतर या दोन रुग्णालयाची निवड केली असेल त्या लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे. दि. १ मे २०२१ रोजी ३५० इतक्याच लाभार्थ्यांनाच कोविन पोर्टलवर नोंदणी करून रुग्णालय निवडता येणार आहे .सदर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉट नुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर जावयाचे आहे. वरील दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंदणी न करता थेट जावू नये त्यांना लस मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
शनिवार दिनांक १ मे २०२१ व रविवार दिनांक २ मे २०२१ रोजी ४५ वर्षापुढील लाभार्थ्यासाठी असलेली पुणे महानगरपालिकेची इतर सर्व लसीकरण केंन्द्रे लस साठा उपलब्ध नसल्याकारणाने बंद राहणार आहेत.जर सोमवार दिनांक ३ मे २०२१ पूर्वी शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास ४५ वर्षापुढील नागरीकाकरिता पुणे महानगरपालिकेकडील लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येतील.
तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे .
Comments are closed