पिंपरी, दि.१( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणारी समाजसेविका म्हणून आदिती निकम यांना ओळखले जावू लागले आहे.

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन  कष्टकरी कामगार वर्गातील लहान मुलांना, महिलांना, अनाथ, निराधारांनाही आनंदाचा व्हावा म्हणून आदिती निकम यांनी औंध मधील परिहार चौक येथे स्वतः पदपथ विक्रेता बनुन कॅरिबॅग विक्री करून ते पैसे गोरगरिब पदपथ विक्रेत्यांकडे सूपूर्त केले.  पदपथावर थांबलेले लोक जवळ येताच लोक गाडीच्या काचा बंद करून घेतात. इथे मात्र स्वतः पदपथ विक्रेता बनुन चौकात कॅरिबॅग विकणे ही तळमळीने काम करणाऱ्या सामाजिक कार्याचे वेगळेपणच म्हणायला हवे.

यापूर्वीही कामगार वसाहतीत जावून प्रत्येक सण साजरा करणे, लहान मुलांना खाऊवाटप करणे, स्वच्छतेचे महत्व सांगणे, वस्तीतील मुलांना शिकवणे असे उपक्रम यांच्याकडून सातत्याने चालू आहेत.

 

Comments are closed

error: Content is protected !!