• वाढदिवस साधेपणाने साजरा करत अनाथ आश्रमास धान्य वाटप.

सांगवी,दि.१( punetoday9news):- पोलिस म्हटलं की खाकी वर्दीतील शिस्तबद्ध रागीट व्यक्ती असंच काहीसं चित्र सामान्य नागरिकांच्या नजरेत असते. मात्र काही अपवाद असे असतात की जे आपल्या कार्याने माणुसकीचे वेगळे रूप जनमानसात निर्माण करतात. रोहिदास बोऱ्हाडे हे सांगवी पोलिस स्टेशन मधील असेच व्यक्तिमत्व जे सांगवी, पिंपळे गुरव परिसरात निर्माण झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण शहरात हाहाकार माजला असताना आपला वाढदिवस साजरा करणे योग्य नसून गोरगरिबांना मदत करावी या भावनेतून त्यांनी दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमास आवश्यक धान्य वाटप केले.

सांगवी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले रोहिदास बोऱ्हाडे हे मुळचे  जुन्नर तालुक्यातील देवळे या लहानश्या वस्तीतील आहेत.  हालाकीची आर्थिक परिस्थिती असताना जिद्दीने अभ्यास करून ते पोलिस दलात भरती झाले. पोलिस दलात भरती झाल्यानंतरही ते आपला भुतकाळातील कष्टाचा इतिहास व आईवडीलांचे संस्कार विसरले नाहीत. माणुसकीचा धर्म आचरणात आणत त्यांनी वेळोवेळी आपल्या सत्कार्यातून गरजवंताची मदत केली.

आपल्या पोलिस दलातील सेवेबरोबरच गरजवंत विद्यार्थांना मदत करणे ,  शालेय वस्तू व साहित्य देणे , मुलांना खाऊ वाटप करणे  यासारखे समाजोपयोगी उपक्रम ते वर्षभर राबवत आहेत .

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमास आवश्यक धान्य व इतर वस्तूंची मदत करून इतरांना आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी आश्रमातील सदस्य,सामाजिक कार्यकर्ते धीरज कांबळे, अजय कांबळे, मारूती हिराळे, राम पवार, राजेंद्र भिसे, सोमनाथ असवले, अब्दुल अन्सारी व मित्र परिवार उपस्थित होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून मदतकार्य करण्यात आले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!