पिंपळे गुरव,दि.२( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील सांगवी परिसर महेश मंडळतर्फे कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २३व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

रातज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले . या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तसंकलनसाठी पुणे सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका शारदाताई सोनवणे, सतीश लोहिया, मनोज अटल, कुलदीप बजाज, गजानंद बिहाणी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल ,दीपेश मालानी , गणेश चरखा ,तुषार चांडक ,विवेक झंवर यांनी सहकार्य केले.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!