पुणे,दि.२(punetoday9news):-  पुण्यात जावयाने सासूचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे . दोघांमध्ये अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध असुन बिबवेवाडी येथे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असताना त्यांचात सतत वाद होत होते . शनिवारी यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि जावयाने सासूचा गळा आवळून खून केला .

अनारकली महम्मद तेरणे ( वय ४५ ) असे मयत सासूचे नाव असून आसिफ दस्तगीर आत्तार ( वय २६ ) आरोपी जावईचे नाव आहे . ते दोघे मूळचे कर्नाटक येथील होते . वर्षभरापासून ते बिबवेवाडी येथे एकत्र राहण्यास होते . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत अनारकली महम्मद तेरणे या महिलेच्या मुली सोबत आरोपी आसिफ दस्तगीर आत्तार याचे लग्न झाले होते . पण लग्नानंतर काही दिवसांनी जावई आणि सासू यांच्यातच प्रेम संबध असल्याचे अनारकली यांच्या पतीला आणि मुलीला समजले . त्यानंतर आरोपीची पत्नी त्याला सोडून निघून गेली . यामुळे सासू आणि जावई कर्नाटकमधून पुण्यात राहण्यास वर्षभरापूर्वी आले होते .

आसिफ हा अनारकलीकडे जेवण व्यवस्थित करत नसल्याची तक्रार करत असे . त्यावर घरात खर्चासाठी पुरेसे देत नसल्याची तक्रार आसिफची सासू करत असे . या कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत होते . शनिवारी देखील दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर आसिफने ओढणीच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला . या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच आसिफला अटक केली आहे . बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत .

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!