फुगेवाडी,दि.३(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने होत असलेले १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्र फुगेवाडीतही व्हावे अशी मागणी तालीम प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय वाझे यांनी आयुक्तांकडे ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे.
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने सध्या चालु असलेल्या लसीकरण केंद्रावर अतिरिक्त भार वाढेल व नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे . तसेच केंद्रावर मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे संसर्गही वाढू शकतो .
याकारणास्तव फुगेवाडी येथे लोकमान्य टिळक शाळा , फुगेवाडी , येथे मुबलक व प्रशस्त जागा असल्याने महापालिका प्रशासनाने ह्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व महापौर यांच्याकडे आली आहे.
Comments are closed