पिंपरी, दि. ३(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरात कोविड -१ ९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी लसीकरण करण्यात येत आहे.
त्यानुसार दि .०१/०५/२०२१ पासून भारत वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड -१ ९ लसीकरण शहरात ०३ लसीकरण केंद्रे- नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी ६०० नोंदणी केलेल्या नागरीक, लाभार्थ्यांपैकी ५८० लाभार्थीना लसीकरण करण्यात आले आहे .
मात्र दि . ०४/०५/२०२१ रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही
तसेच उद्या दि .०४ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी सुरु राहणार आहे . याकामी नागरीकांनी / लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे . Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी . फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील तीन्हीं लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे , तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे . असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed