औरंगाबाद,दि.४( punetoday9news):- औरंगाबाद मध्ये बायकोसमोर हिरोगिरी करण्याच्या नादात एका तरुणाने लग्नाच्या वाढदिवशी चक्क तलवारीने केक कापण्याचा ‘ पराक्रम ‘ केला . आणि विडिओ सोशल मिडियावर पसरताच पोलिसांनी याची दखल घेत बेड्या ठोकून लग्न वाढदिवसाची चांगलीच भेट दिली.
सराईत आरोपी असणारा दीपक सरकटे याने लग्नाच्या वाढदिवसाला बायकोसमोर हिरोगिरी करण्याच्या प्रयत्नात व आपली समाजात किती दहशत आहे हे दाखवण्यासाठी तलवारीने केक कापून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या समोरच बायकोसोबत त्याने तलवारीने केक कापला . या प्रकाराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता .
तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणे दीपकला चांगलेच महागात पडले . अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आणि घटनेनंतर काही तासांतच केक कापणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली .
Comments are closed