पुणे,दि.४(punetoday9news):- “मन निरोगी असेल तर कोणत्याही आजारावर मात करता येते’ हे लक्षात घेऊन, कोरोना कालावधीत सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पुणे महानगरपालिका आणि योगऋषी स्वामी रामदेवजी प्रणित पतंजली योग समिती पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुण्यातील होम क्वारणटाईन, बरे झालेले रुग्ण आणि सर्वच पुणेकरांसाठी योग प्राणायाम आणि आयुर्वेदिक व घरगुती औषधांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण गुगल मीट आणि फेसबुक लाइव्ह द्वारा बुधवार दिनांक ५ मे २०२१ पासून सुरू होत आहे.
कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या covid-19 या रोगाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनाच्या या लाटेमध्ये अनेकांना संसर्ग होऊन बरेच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रित करण्याकरिता पुणे महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने, रुग्ण तसेच त्याच्या परिवारावर मानसिक ताण वाढत आहे. समाजात निर्माण झालेल्या या भीतीच्या वातावरणातून नवीनच सामाजिक समस्या भविष्यात निर्माण होऊ शकते.
या योग शिबिराची सुरुवात मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे यांच्या शुभहस्ते आणि उपमहापौर सुनिता वाडेकर, अध्यक्ष स्थायी समिती हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, पुणे महानगरपलिका माहिती व तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप याचबरोबर योगऋषी स्वामी रामदेव महाराज आणि पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉक्टर जयदीप आर्य, बापू पडळकर, राज्य प्रभारी महाराष्ट्र (प.), पतंजली योग पीठ, हरिद्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. ५/५/२०२१ रोजी सायंकाळी ५ वा. ऑनलाईन होणार आहे.
कार्यक्रमाची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
गुगल मीट लिंक meet.google.com/ctq-awcu-xar
फेसबुक लिंक https://www.facebook.com/PMCPune
या प्रशिक्षणात पतंजली योगपीठाचे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक व आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण दिवसातून दोन वेळा होणार असून त्याची वेळ सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ५ ते ६ आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत २५ योग व आयुर्वेद तज्ञ फोन द्वारा नागरिकांच्या शंकांचे समाधान करणार आहेत.
सर्व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे यांनी केले आहे.
Comments are closed