पुणे, दि.५(punetoday9news):- जिल्ह्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,छावणी नगरपरिषद , सर्व नगरपरिषद : पुर नियंत्रण आराखडा तयार करणे.
शहरी भागात निधीलगत झोपडपटयामध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करणे, जेणेकरुन त्या भागात रहाणा-या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करणे सोपे जोईल व आराखडा तयार करण्यात यावा.
पावसाळयात वादळी वा-यासह झाडे उन्मळून पडुन मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करावी. महानगरपालिकेच्या , नगरपरिषदेच्या हद्यीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास देणे. नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटटया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करुन योजना ठरविणे व नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे.
नदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणे, तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करणे, गटार सफाई करणे व औषधी फवारणी करणे.
पालिकेच्या हद्यीतील सर्व जुन्या इमारतीचे , वाडयाचे बांधकाम तपासणी (Stuructural Audit) पावसाळ्यापूर्वी करुन घेण्यात यावी.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणे, नियंत्रण कक्षामध्ये नोडल ऑफिसरची नेमणुक करणे. तसेच ज्यांनी फायर विभागाची ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही, अशा हॉस्पीटल,इमारती यांचेवर कार्यवाही करणेआवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, त्याप्रमाणे फायर विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही, अशा इमारती, हॉस्पिटल यांची तपासणी करण्यात यावी. याबातचा अहवाल दोन्ही महानगरपालिकांनी या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करावा. याबाबत अहवाल सादर न केल्यास अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कार्यवाही केली जाईल.
नदीपात्रामध्ये गाडया पार्किंग केल्या जातात. धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळेस अथवा पावसाळयात अनेकदा नदीपात्र पूर्ण भरल्यानंतर नदीपात्रात पार्किंग केलेल्या गाडया वाहुन गेल्या आहेत याबाबत पुणे महानगरपालिका यांनी दक्षता घ्यावी.
धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस , सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.धोका असणाऱ्या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

पुणे मेट्रो
मेट्रो प्रकल्पांतर्गत मोठया प्रमाणात कामे चालू आहे. त्यामध्ये मोठया प्रमाणात खोदकाम केले आहे. सदरची कामे पावसाळयापूर्वी करणे आवश्यक आहे. उदा. मेट्रो प्रकल्प, नदीपात्रात होणारे बांधकाम तसेच मेट्रोचे काम चालू आहे. त्याठिकाणी ट्रॅफिक होत असल्याने सुरक्षा गार्ड, सुरक्षारक्षक अशा यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, याबाबत पोलीस यंत्रणाशी समन्वय ठेवण्यात यावा.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन या कार्यालयास सादर करावा.

पाटबंधारे विभाग
जिल्हयातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन अहवाल सादर करावा.
पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाची उपाययोजना याबाबत आराखडा निश्चित करणे. उदा. धरण सुरक्षा
मुख्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करणे, समन्वय अधिकारी यांची नेमणुक करावी.
धरणातील सोडण्यात येणा-या पाण्याबाबत नागरिकांना सूचना करणे, त्याचबरोबर जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षाला कळविणे, अधिकृत सक्षम अधिका-याच्या मदतीने पाणी सोडावयाचे की नाही याबाबत निर्णय घेणे.
मोठया क्षमतेच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांची नेमणुक करणे आणि नियंत्रणाचे कार्य करणे.
जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी (Structural Audit) पावसाळ्यापूर्वी करुन घेण्यात यावे. धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी. धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून (पोलीस,सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निश्चित करावा. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावे. धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमानपत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पुणे विभाग
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील साहित्याची माहिती ऑनलाईन अद्यावत करणे.
पुणे जिल्हयातील धोकादायक पुलांची पावसाळयापूर्वी पाहणी करुन घेण्यात यावी.
जिल्हयातील जुन्या इमारती, वाडे बांधकाम तपासणी (Stuructural Audit) पावसाळयापुर्वी करुन घेण्यात यावे. आपले कार्यालयाकडील अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, यांचा समन्वय असणेआवश्यक आहे. उदा. एखादे झाड रस्त्यावर पडले तर तात्काळ कार्यवाही करावी.
मान्सून पूर्वी सर्व रस्त्यांचे साईड पटटे भरुन घ्यावीत.
महामार्गालगत,रस्त्यालगत उत्खणनामुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित करणे, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल.
धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग , वन विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.

जिल्हा शल्यचिकीत्सक, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तात्काळ तयार करुन अद्यावत माहितीसह या कार्यालयास सादर करावा.
पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
आपत्तीच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्सचा आराखडा तयार करणे.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे
पुरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करणे. आपत्तीच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक 108 सर्व विभागांना देण्यात यावा. पावसाळयाच्या कालावधीमध्ये साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून उपाय योजना करावी. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष उभारणे, आणीबाणीच्या कामासाठी स्थानिक डॉक्टर किंवा स्थानिक स्वयंसेवक संघटना इत्यादींना तातडीने एकत्रित करणे.

जिल्हा अधिक्षक कृषि विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद, पुणे
तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी यांचे समन्वय असणे आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करुन त्या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. तसेच गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यास, झाल्या पिकांचे , फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल या कार्यालयास सादर करावेत.
कृषि विभागाचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात यावा.

 

पोलीस आयुक्तालय पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड / पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पोलीसअधिक्षक राष्ट्रीय महामार्ग / एन. डी. आर. एफ./होमगार्ड

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक अंदाज घेवून अधिकारी/कर्मचारी यांचेशी सल्लामसलत करणे. आपत्तीचे वेळी नियंत्रण कक्ष प्रमुखाची नियुक्ती करणे. आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क नंबरसह यादी ठेवणे.
शोध व बचाव कार्य यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता याबाबत पूर्व तयारी करणे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित होतो परिणामी वाहतुक व्यवस्था कोलमडते त्यासाठी पर्यायी
रस्त्याचा वापर करण्याबाबत उपाययोजना करणे.
आपत्तीच्या काळात जखमी लोकांना प्राधान्याने रुग्णालयामध्ये हलविणे, तसेच रुग्णालयाच्या ठिकाणी जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे.

पोलीस अधिक्षक ग्रामीण यांनी मान्सून कालावधीसाठी 1 जून पासून जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये 24 तासासाठी पथकाची नियुक्ती करण्यात यावी.
धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस , सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.धोका असणान्या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

उपविभागीय अधिकारी / तहसिलदार
तालुकास्तरावर सर्व तालुका स्तरावरील विभागांची बैठक घेण्यात यावी. आवश्यक असणा-या साहित्याची तसेच उपलब्ध असणा-या साहित्याची यादी तयार करण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी कर्मचारी यांचे नांवे, फोन नंबर यांची माहिती अद्यावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या आदेशाची एक प्रत सादर करावी.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या प्रकल्पांतर्गत पावसाळा कालावधीतील पूरामुळे बाधीत होणा-या क्षेत्राची यादी तयार करावी व पावसाळयापूर्वी सदरचे काम करुन घेण्यात यावी. उदा. नदीपात्रात होणारे बांधकाम, तसेच अनधिकृत बांधकाम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अखत्यारीत जादा प्रमाणात आहेत.
अनधिकृत बांधकामाबाबत कार्यवाही करण्यात यावी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तात्काळ या कार्यालयास सादर करावा.

नागरी संरक्षण दल / राष्ट्रीय सेवा योजना-
नागरी संरक्षण दलाच्या विभागा मार्फत वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करावे. राष्ट्रीय सेवा योजना मार्फत शोध व बचाव करण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्यात यावा.
1 जून पासुन नागरी संरक्षण दलातील कर्मचारी जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये नेमणूक करावी.

अधिक्षक अभियंता शहरी व ग्रामीण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पुणे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पावसाळयाच्या कालावधीमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
जमिनीखालील विज लाईन टाकताना खोदकाम केले असेल तर पावसाळयापूर्वी खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरुन सोसायटीमध्ये पाणी शिरणार नाही, याची खात्री करावी.
आपत्तीच्या काळात विज खंडीत झाल्यास तातडीच्या दुरुस्तीसाठी सुसज्य पथक तयार ठेवावे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पथकाची नियुक्ती करण्यात यावी.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

भारतीय संचार निगम लिमिटेड
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्तीच्या बाबतीमध्ये माहिती हवी असल्यास जिल्हयातील नागरीकांना ती दूरध्वनीवरून विनाशुल्क उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे.
आपत्ती काळात दूरध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये. तसेच अत्यावश्यक दूरध्वनी कनेक्शन कट करणेत येऊ नये,
आपत्ती काळात संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी मोबाईल टॉवर सुसज्ज ठेवावे. जिल्हयातील संपर्कहीन गावांचा सर्वे करुन संपर्क प्रस्थापित करण्यासाठी योजना राबवावी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तात्काळ या कार्यालयास सादर करावा.
जिल्ह्यातील विविध विभागामधील नियंत्रण कक्षामधील टेलीफोन बंद पडणार नाही यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेडचे पथक नियुक्त करावे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग
आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा व नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी. पावसाळयामध्ये ब-याच वेळा टँकर उलटतात त्यासंबंधी निगडीत असलेल्या कंपनीशी संपर्क साधून त्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देणे. उदा. वायु, पेट्रोल, डिझेल इत्यादी गळती
जिल्हयातील धोका प्रवण कंपन्यांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन जिल्हा नियंत्रण कक्षात देण्यात यावा.

हवामान विभाग
पावसाच्या अंदाजाविषयी हवामान खात्यातून आगाऊ सूचना देण्यात याव्यात, उदा. पाऊस, वीज, भुकंप इ. तसेच हवामान विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या नोडल ऑफिसरचा दूरध्वनी व मोबाईल नंबर आपत्ती संबंधित सर्व विभागास देणे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे
जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये कर्मचारी नेमणुक करणे.
पाटबंधारे विभागात सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, जिल्हा परिषद इत्यादी विभागातील कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात यावी.
पावसाची आकडेवारीचा अहवाल तयार करण्यासाठी पावसाळा कालावधीपर्यंत महसुल विभागातील एका लिपीकाची नियुक्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात यावी.

आकाशवाणी पुणे व दुरदर्शन विभाग पुणे
जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात येणा-या आपत्तीबाबत पुर्वसुचना प्रसारीत करणे.

जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी व पुरवठा अधिकारी
पूर प्रवण व दुर्गम गावामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणे(स्वस्त धान्य दुकानामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणे

जिल्हा माहिती अधिकारी
जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात येणा-या आपत्तीबाबत पुर्वसुचना प्रसारीत करणे.
धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

प्रादेशिक परिवहन विभाग
नदीपात्रामध्ये गाडया पाकींग केल्या जातात. धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळेस अथवा पावसाळ्यात अनेकदा नदीपात्र पूर्ण भरल्यानंतर नदीपात्रात पाकींग केलेल्या गाडया वाहून गेल्या आहेत, याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी दक्षता घ्यावी.
वाहनाचे फिटनेस सटीफिकेट मुदती बाहय झालेले असतात ते संबंधीतांनी अद्यावत करुन घ्यावे.

वन विभाग
पुणे जिल्हयातील बराच भाग वनक्षेत्रात येत असल्याने वन विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा.
लोकवस्ती जवळील धोकादायक ठिकाणांचे (दरडीबाबत) सर्वेक्षण करण्यात यावे.
वन विभागांच्या क्षेत्रात किंवा लगत आपत्ती निर्माण होणार नाही याची दक्षता वन विभागाने घेण्यात लागणे.
जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. त्याची माहिती सर्व विभागांना देण्यात यावी. यावी. उदा. आग धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस / सार्वजनिक बांधकाम विभाग / वनविभाग / पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.

प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे / पुरातत्व विभाग
पुणे जिल्हयातील पर्यटन स्थळांबाबत सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी यादी तयार करण्यात यावी.
धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस / सार्वजनिक बांधकाम विभाग / वन विभाग विभाग/पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.
धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
पर्यटन विभागांकडे असलेल्या साहित्याची माहिती देण्यात यावी व सदरचे साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे.
पुणे जिल्हयातील पावसाळा कालावधीमध्ये इतर कालावधीमध्ये पुणे जिल्हयातुन व बाहेरील जिल्हयातील तसेच
राज्यातून पर्यटक येत असतात. त्यासाठी पुणे जिल्हयाचा पर्यटनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा.

रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.
आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळ्या नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.

वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल आणि सर्वेक्षण यंत्रणा, पुणे
पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर व इतर ठिकाणी संभाव्य दरड कोसळणारा भाग आहे. अशा ठिकाणांचा सर्वे करून संरक्षणात्मक उपाय योजना करण्यासाठी आपल्या स्तरावरील पावसाळा कालावधीसाठी स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी.
पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.
आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळया नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.

जिल्हा परिषद, पुणे
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सर्व विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा. कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.
आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळ्या नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!