पुणे,दि.५(punetoday9news):- दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली असुन याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे हे त्यांच्या केडगाव येथील राहत्या घरी असताना , किरकोळ कारणावरून केडगावातील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला आहे . मंगळवार दि . ४ मे रोजी सकाळी ८:३० ते ९ च्या सुमारास ही घटना घडली . या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींची मच्छिंद्र घोगरे , तुषार घोगरे , राहुल ससाणे व विशाल कोतकर अशी नावे असून , गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही . याबाबत अभिजित अजिनाथ तांबडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात कालच रितसर तक्रार दाखल केली आहे . तरी सदर आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी , अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
Comments are closed