दिल्ली, दि. ७( punetoday9news):-  देशभरात कोरोनाचे रूग्ण संख्या वाढतच असून नागरिक हतबल झाले आहेत. लसनिर्मिती भारतात होत असली तरीही लसीकरण सर्वत्र पुर्ण क्षमतेने चालत नाही. लस संपली चे बोर्ड नागरिकांच्या मनात धडकी भरवत आहेत. त्यातच  सुब्रमन्यम स्वामींचे नितीन गडकरींकडे कोरोना लढ्याचे नेतृत्व देण्याचे वक्तव्य सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाविरोधीत लढ्याचे नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवले जावे अशी मागणी केली आहे . कोरोना संकटाच्या या काळात पंतप्रधान कार्यालय काहीच कामाचे नसून नरेंद्र मोदींनी परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यांचे सहकारी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी , अशी मागणी स्वामी यांनी केली आहे .

 

तर नितीन गडकरी यांनीही स्वामींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की कुणाच्या बोलण्याने काही बदलत नाही. सर्व जण योग्य प्रकारे काम करत आहेत. जात,धर्म, पंथ याच्या पुढे जावून विचार व काम करण्याची गरज आहे.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!