पिंपरी,दि.७(punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहरात उद्या शनिवार दि.८ रोजी शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. मात्र पुर्वनोंदणी केलेल्या वयोगट १८ ते ४४ वर्षे मधील नागरिकांना लस मिळणार आहे.

त्या करिता ०८ लसीकरण केंद्रे खालील प्रमाणे-
१)नवीन भोसरी रुग्णालय – ४११०२६,
२)नवीन जिजामाता रुग्णालय-४११०१७,
३)प्रेमलोक पार्क दवाखाना-४११०३३,
४)यमुनानगर रुग्णालय-४११०४४,
५)डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी- ४११०१८,
६)पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कुल-४११०२७,
७) नवीन आकुर्डी रुग्णालय – ४११०३५ व
८) आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी-४११०२७
यासाठी नागरीकांनी, लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे दि.०८/०५/२०२१ रोजी वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही . या अनुषंगाने सर्व नागरीकांना वैद्यकीय विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे. असे वैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!