पुणे,दि.१४(punetoday9news):- सरकारी रुग्णालयाप्रमाणेच खाजगी रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्य हे अभिमानास्पद आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून भारतीय जनता पार्टी एनजीओ आघाडीच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत अविरत झटणाऱ्या समस्त भगिनींच्या सेवाकार्यास सलाम म्हणून दळवी रुग्णालय शिवाजीनगर, संत रामदासस्वामी प्राथमिक विद्यालय व लायगुडे हॉस्पिटल येथील परिचारिकांचा सन्मानपत्र देऊन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 
       शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खा. गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा एनजीओ आघाडी पुणे शहराध्यक्ष डॉ. अजय दुधाने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पवार, डॉ. किरण भिसे, संजय हिरवे, महेश वाडेकर, विवेक राजगुरू, धनंजय मराठे, गणेश ईरला, जय जोशी आदी उपस्थित होते. नीना अँग्रे, सविता झावरे, वर्षा गवई, अनघा थिटे, डॉ. फराह सैय्यद, पुनम माने, अश्विनी बनसोडे, गीतांजली धुमाळ, प्रियांका साळवे, मनीषा घोरपडे, सारिका जाधव, चैत्राली तरडे, मनीषा शिंदे, कमल भोई, जयश्री जाधव यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
        सूत्रसंचलन दत्तात्रय सोनार, तर आभार संजय हिरवे यांनी मानले.

Comments are closed

error: Content is protected !!