पुणे,15( punetoday9news):-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे मार्फत यु.पी.एस.सी नागरी सेवा मुख्य परीक्षा -2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 22 उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करीता आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक उमेदवारांची केंद्रीय सनदी अधिकारी पदी नेमणूक होण्याकरीता उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजनेसोबतच मुलाखतीचे पूर्वतयारी प्रशिक्षण देण्याची योजना बार्टी संस्थेने आखली आहे. त्यानुषंगाने कोव्हिड-19 या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या 22 पात्र उमेदवारांना 10 मे 2021 पासून यु.पी.एस.सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

समाज कल्याण,आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून सदर पूर्वतयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रशिक्षण 13 जून 2021 पर्यंत देण्यात येणार असून यामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकारी या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांचे दोन मॉक इंटरव्ह्युव घेण्यात येतील. असेही पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!