पिंपरी,दि.१५( punetoday9news):- कोविड – १९ संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य म्हणून ऑक्सफॅम इंडीया या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने ०२ ऑक्सिजन क़ॉन्सेन्ट्रेटर मशीन्स व आरोग्य कर्मचा-यांकरिता ५० सँनेटायजेशन किट मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व क क्षेत्रिय कार्यालयाचे सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले .
सी.एस.आर. उपक्रमाअंतर्गत देण्यात आलेले ही वैद्यकिय उपकरणे वाय.सी.एम.एच.रुग्नालय औषध भांडार येथे देण्यात आली. यावेळी ऑक्सफॅम इंडीयाच्या वतीने परमेश्वर पाटील , अनंत पेठगावकर व निखिल वाघ , तसेच क क्षेत्रिय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे , सहा.आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे व मुख्य आरोग्य निरिक्षक विजय दवाळे उपस्थित होते .
Comments are closed