• कोरोना विषयक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून समाजोपयोगी कार्यातून जयंतीदिनी शंभूराजेंना वंदन.
सांगवी,दि.१६( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर संस्थेतर्फे छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीव ठेऊन समाजातील वंचित घटकांना अन्नधान्य कीटचे वाटप करत शंभुराजेंची जयंती साजरी केली.
दरवर्षी या संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात शंभुराजे यांची जयंती साजरी करण्यात येते. परंतु मागील वर्षी व या वर्षी कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून जयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करता घरगुती पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
इतर खर्च वर्जित करून संस्थेने सामाजिक भान राखत सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करून सांगवी , पिंपळे गुरव , दापोडी या परिसरातील तृतीय पंथीय समाज बांधवांना २००किलो गहू तसेच २०० किलो तांदळाचे वाटप करण्यात आले . तसेच परिसरातील सुमारे १७० गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप केले. त्याचबरोबर संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिघी मधील ज्ञानदीप बालगृह अनाथ आश्रम व दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रम येथे ही गहू , तांदूळ ,साखर ,पोहे इत्यादी धान्याचे वाटप करत ‘यंदा आपणही हे कर्तव्य पार पाडू’ या संकल्पनेतून राजमाता जिजाऊंना , छत्रपती शिवरायांना व शंभुराजांना मानवंदना दिली.
Comments are closed