पिंपरी,दि.१६(punetoday9news):- चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली . अतुल तानाजी भोसले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले असून यामध्ये निघृणपणे हत्या केली जात असल्याचे दिसत आहे .
हत्या झालेला अतुल भोसले हा म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुरवठा करत होता व कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून आरोपी अक्षय शिवले यांच्यात वाद निर्माण झाला होता. आरोपी अक्षयने मयत अतुल भोसले याना फोन करून मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे असे सांगितले . यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला होता अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली आहे .
म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले याला गाठून त्याच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले . अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे . या घटनेप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे .
तसेच अक्षय शिवले , गणेश ढरमाळे , गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Comments are closed