पिंपरी,दि. १६( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे पिंपरी रेल्वे स्टेशन येथे गरजवंत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून अन्नदान व फळवाटप करण्यात आले.
शारीरिक शिक्षकाची विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. शाळेतील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमामध्ये महामंडळाचे सर्व शिक्षक कार्यरत असतात. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील गरजवंत नागरिकांना मदतकार्य करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, निवृत्ती काळभोर , संतोष म्हाञे, पोपट माने, रमेश कुदळे, विष्णूपंत पाटील, अमित खराडे, अंजली वर्टी, उमा काळे, हर्षदा नळकांडे, आशिष मालुसरे, राम मुदल, अभिषेक कदम, अमित पवार इत्यादी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
Comments are closed