पिंपरी, दि. १७( punetoday9news):- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महानगरपालिका आस्थापनेवरील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचा-यांना लॉकडाऊन कालावधीत कार्यालयातील उपस्थितीमध्ये सुट देण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी निर्गमित केला आहे.

          महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेवून शासकीय कार्यालयातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयातील उपस्थितीत सुट देण्याबाबतच्या सूचना शासनातर्फे पारित करण्यात आलेल्या आहेत.

          दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करणे कष्टप्रद आणि त्रासदायक होत आहे.  सर्व दिव्यांग   कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यास व त्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  या सूचनांचे कार्यालयांमध्ये काटेकोरपणे पालन होईल याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.

          या सवलतीमुळे विभागांतील दैनंदीन कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभाप्रमुखांनी घ्यावी, वर्क फ्रॉम होमची सवलत दिलेल्या दिव्यांग कर्मचा-यांनी आभासी माध्यम (व्ही.सी.), ईमेल, व्हॉटसअप, गुगल मीट, घरगुती संगणक इत्यादी आधुनिक माध्यमांचा वापर करुन कार्यालयीन कामकाजाकरीता संपर्कात राहून कामकाज करावे, असे आदेशात नमूद केले आहे.  या सूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!