चिंचवड,दि.१८(punetoday9news):-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना साथीशी निगडित नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून महासेतू सोल्युशन्स एलएलपी, ग्लोबल हयुमन ऑरगनायझेशन यांच्या समन्वयातून ‘पोलीस सॅमरिटन’ या नावाने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

ही हेल्पलाईन (17 मे 2021) रोजी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील नागरिक खालील प्रकारच्या समस्यांसाठी हेल्पलाइनवर फोन करू शकतात. नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे पोलिसांकडून तात्काळ निरसन केले जाणार आहे.

कोविड सुसंगत आचरण

यामध्ये कोविड पॉझिटिव्ह असताना सदर रुग्ण समाजामध्ये वावरत असेल, नागरिक सामाजिक अंतराचे (Social Distance) पालन करत नसतील नागरिक मुखपट्टीचा (Face Mask) वापर न करता वावरत असतील. ज्यांना परवानगी नाही अशा आस्थापना (दुकाने हॉटेल्स) सुरू असतील. वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून आस्थापना सुरू असतील. अशा बाबतीत हेल्पलाइनवर तक्रार करता येईल.

नागरिकांची होणारी कोणतीही पिळवणूक
कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालक अवाजवी दर आकारत असतील. Remdecever, Tocilizumamb या किंवा इतर कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार होत असेल.कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी होत असेल. आंतरजिल्हा/आंतरराज्य प्रवासासाठी बनावट पास बनवले जात असतील. बनावट कोरोना ( RTPCR / Rapid antigen report) अहवाल बनवले जात असतील अशा बाबतीत नागरिक हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकतात.

रुग्णाला डिस्चार्ज देताना रुग्णालयाचे अंतिम देयकाबाबतच्या कोणत्याही तक्रारीचा अंतर्भाव या हेल्पलाईनमध्ये केलेला नाही. हॉस्पिटल बिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास कोविड बिल लेखा परीक्षण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेशी संपर्क साधावा.

मदतीची आवश्यकता असेल तर फोन करा

संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे Home Quarantine असल्यास औषध जेवण, भाजीपाला याची आवश्यकता असेल, कोरोनामुळे कोणताही शिशु अनाथ झाला असेल आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यास कोणीही नसेल अशा प्रकारच्या मदतीसाठी नागरिक हेल्पलाईनवर मदत मागू शकतात.

वरिल कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास नागरिकांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

‘पोलीस सॅमरिटन’ हेल्पलाइनचे क्रमांक
8010430007
8010810007
8010460007
8010830007
या कार्यात स्वयंसेवक म्हणून आपण सहभागी होणार असाल तर ओंकार गौरीधर यांच्याशी संपर्क साधावा.आपणास कार्यरत होण्यासाठी आवश्यक गोष्टी व माहिती दिली जाईल. (महासेतू सोलुशन्स एलएलपी)वरील नमूद फोन नंबर वर संपर्क साधावा अथवा आपले नाव,पत्ता whatsapp करावा आपणास संपर्क करण्यात येईल.

Comments are closed

error: Content is protected !!