पिंपरी,दि. १९( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड येथे हातभट्टी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपी गोविंद सखाराम गायकवाड (वय २४ वर्षे रा . गावडे कॉलनी लिंक रोड चिंचवड पुणे) यास ३५० लि. गावठी हातभट्टीची दारु व कार सह ताब्यात घेवुन एकुण १,१४,००० चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कृष्णप्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी झिरो टॉलरन्स अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व प्रकारच्या अवैध धंदयाबाबत प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार डॉ.विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. दि .१८ रोजी थेरगाव मार्शल म्हणुन ड्युटीवर असणारे दत्तप्रसाद चौधरी यांना बातमी मिळाली की , वाकड पोलीस स्टेशन हद्दीतून एक सॅण्ट्रो कार गावठी हातभट्टीची दारु घेवुन पुनावळे गावठाणकडुन चिखलीकडे जाणार आहे. त्यानुसार सापळा रचुन सॅण्ट्रो कार क्र. एम एच. १२बी.ई ९२३ चालकाससह पुनावळे गावठाण रोडवर पकडण्यात आली . यावेळी कारच्या डिक्कीमध्ये व पाठीमागील सिटवर गावठी दारुचे १० प्लॅस्टीक कॅण्ड एकुण अंदाजे १ लाख १४ हजार रु. असा मुद्देमाल आढळून आला . याबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , रामनाथ पोकळे . अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , आनंद भोईटे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – २ पिंपरी चिंचवड , श्रीकांत डिसले सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पोलीस ठाणे , संतोष पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सुनिल टोणपे पोलीस निरीक्षक ( गुन्हे -२ ) , अनिल लोहार , पोलीस नाईक १५६० चौधरी , गायकवाड , कुदळे , आनंद भोईटे यांनी केली आहे.
Comments are closed