पिंपरी,दि. १९(punetoday9news):- पिंपळे गुरव येथील युवा उद्योजक कुंदन सुनील कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील वंचित ,गोरगरीब लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत परिसरातील ३० गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य कीटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून दोन वेळचे जेवण मिळविणेही मुश्कील झाले आहे. या परिस्थितीत अशा कुटुंबीयांना आपल्या परीने दिलासा देण्यासाठी कुंदन कदम यांनी वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च टाळून जगदंब प्रतिष्ठान व कै. बबनराव भाऊसाहेब कदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरातील ३० गरजू कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला . याप्रसंगी श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते विलास कदम, डॉ. एम. एस. पुजारी, प्रणिकेत कदम, आदेश कदम, उमेश भालेकर, मंगेश फडके, प्रकाश लोंढे, प्रणिकेत चौधरी, स्वप्नील कदम, प्रवीण कदम, गणेश कदम, माऊली कदम, योगेश कदम, प्रवीण चव्हाण, विशाल काशीद, रमेश मुठे, राकेश शिर्के, बाळू एकशिंगे आदीजण उपस्थित होते.

यावेळी कुंदन कदम यांनी सांगितले की, सर्व सामान्य नागरिकांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ येऊ नये, अशा संकट समयी एक हात मदतीचा पुढे करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही गरजूंना मदत करत राहणार आहे.

“ हे काम प्रसिद्धीसाठी नाही तर यामधून इतरांनी प्रेरणा घेऊन समाजातील गरजुंसाठी काम करावे हा यामागील उद्देश आहे. आपण समाजाचे देणे आहोत ,या भावनेतून आपआपल्या परीने समोजोपयोगी कामे करून कर्तव्यासोबत माणुसकी जोपासली आहे. जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढेही समाजकार्य सुरू राहील.”

– कुंदन कदम,युवा उद्योजक.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!