पिंपरी,दि.२०( punetoday9news):-  कोवीड लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व अनावश्यक गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी, महापालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. लस पुरवठ्यातील अनियमितता, पहिला डोस व दुसरा डोस यासंबंधी नागरिकांमध्ये असलेला संभ्रम, यामुळे होणारा मनस्ताप टाळणे यासाठी व प्रभावी लसीकरणासाठी पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार परिपत्रकाद्वारे संबंधितांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

1) लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नोंदणी केलेले लाभार्थी वगळता इतरांना शंभर मीटरच्या आत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पण दिव्यांग व जेष्ठ नागरिक आपल्या सोबत एक मदतनीस आणू शकतील.

2) लसीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये दिव्यांग नागरिक प्रथम, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, मग दुसऱ्या डोसचे लाभार्थी, त्यानंतर इतर लाभार्थी. अशा क्रमाने दैनंदित लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

3) कोविशील्ड की कोवँक्सिन यापैकी कोणती लस उपलब्ध आहे. पहिला अथवा दुसरा, कोणता डोस दिला जाणार आहे. याबाबतची माहिती दररोज फलकावर नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

4). दिव्यांग व्यक्तीला आवश्यकतेनुसार व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

5) ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. अशांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण ,प्रभाग स्तरावर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

6)जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, त्यांच्या घरी लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी ‘मी जबाबदार ‘ या अँपवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे .

7) ज्यांना कोवीड होऊन गेला आहे. त्यांना तीन महिन्यानंतर लस देण्यात येईल

8) सर्व स्तनदा मातांना लस देण्यात येईल.

9) लसीकरणाच्या वेळी कायदा सुव्यवस्था व शिस्तीसाठी पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!