चिंचवड,दि.२०(punetoday9news):- पोलिसांच्या मदतीला उपस्थित असणारे ग्राम सुरक्षा दलातील कार्यकर्ते हे पोलीस प्रशासनाच्या कुटुंबातील सदस्य झाले आहेत.सामाजिक सुरक्षा विचारात घेऊन अहोरात्र मदत करणारे अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते सहभागी झाले आहेत ही आनंदाची बाब आहे.असे मत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्राम सुरक्षा दलातील कार्यकर्त्यांना ओळखपत्र,टी शर्ट व कॅप देण्याचा कार्यक्रम चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आला. या दलाचे नेतृत्व चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी यशस्वीरीत्या सुरू केले.पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी या साठी योगदान दिले.
ग्राम सुरक्षा दलामध्ये उच्चशिक्षित तसेच कुटुंबवत्सल व्यक्ती सहभागी झाल्या आहेत ही आनंदाची बाब असल्याचे इप्पर यांनी सांगितले.ग्राम सुरक्षारक्षका बाबत अद्याप पर्यंत एकही तक्रार आली नाही.याचाच अर्थ सर्व नियोजन व्यवस्थित आहे ही जमेची बाजू आहे.पोलीस व नागरिक यांच्यातील दुवा बनून आपण सर्वांनी काम करावे व समाजातील अस्थिरता व योग्य नियोजनाबाबत वेळोवेळी पोलिसांना माहिती द्यावी. चुकीच्या घटना रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दलातील कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस स्टेशन येथील ग्रामरक्षक दलाची शिस्त या विषयी विशेष कौतुक केले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक काटे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन सुभाष मालुसरे,सतीश भारती, धनंजय कुलकर्णी व चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी डी.जी. कांबळे, संतोष फावडे,विठ्ठल मदने यांनी केले.
Comments are closed