ओंकार भागवत व कुटुंबियांकडून ‘सांगवी विकास मंच’ तर्फे मोफत अन्नदान हे गरजवंतांसाठी ठरत आहे जीवनदान.
सांगवी,दि.२१( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील ‘सांगवी विकास मंच’ तर्फे गरजवंत नागरिक व होमक्वारंटाइन कोरोना ग्रस्त रुग्णांची मानवतेच्या नात्याने सेवा म्हणून घरपोच पार्सल स्वरूपात जेवण देण्यात येत आहे.
सांगवी विकास मंच च्या माध्यमातून ओमकार भागवत व कुटुंबीयांतर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
कोरोना काळात कित्येक कुटुंबांचा आर्थिक कणा मोडून हजारो कुटुंबांची वाताहत झाली आहे. मोलमजुरी करणारे कष्टकरी नागरिक एक वेळच्या अन्नासाठी त्रासले आहेत. हाताला काम नसल्याने करायचे काय? व खायचे काय? कुटुंबाचा भार कसा उचलायचा? असा प्रश्न या मजूर वर्गामध्ये निर्माण झाला असताना मोफत अन्नदान उपक्रम त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरत आहे. या अन्नदानाच्या माध्यमातून झालेली मदत ही अमूल्य स्वरूपाची असल्याचे मत व्यक्त नागरीक व्यक्त करत आहेत.
सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून अन्नदानाचा हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
Comments are closed