पुणे दि.22( punetoday9news):- केंद्र शासनाने दि.22 मे 2021 रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याचे अनुदान वाढविण्यात आल्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या सुधारित अनुदानामुळे कमी झालेल्या किंमतीमध्ये खतांची खरेदी करावी.
सुधारित अनुदान जाहिर होण्याच्या पूर्वीच्या किंमतीत खत विक्री होत असल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षामधील भ्रमणध्वनी क्र. ८४४६११७५०० व टोल फ्री क्र. १८०० २३३ ४००० या क्रमांकावर दररोज सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत संपर्क साधावा. तसेच आपल्या जिल्हयाचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त (कृषि), धीरजकुमार यांनी केले आहे.
Comments are closed