पुणे दि.22(punetoday9news):- कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या अनुदान मिळवण्याची अर्जदारांसाठीची कार्यपध्दती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदारांनी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Autorickshaw Financial Assistance Scheme / परवानाधारक ॲटोरिक्षा चालकांनी अर्थिक सहाय्य येथे अर्ज करावा.

या कार्यपध्दतीनुसार अर्जदाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकावा, अर्जदारास ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी आल्यानंतर अर्जदाराने लॉगीन करावे. आधार क्रमांकाची नोंद करावी. आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास सेल्फ (SELF) हा पर्याय निवडावा. वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने वारसा / उत्तराधिकारी हा पर्याय निवडावा. परवानाधारक अर्जदाराने आपला आइत. रिक्षा क्रमांक दोन वेळा नोंद करावा. परवानाधारक अर्जदाराने आपला अनुज्ञप्ती क्रमांक दोन वेळा नोंद करावा. तथापि, अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास केवळ उपरोक्त माहिती भरावयाची आहेत. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने लायसन्स नोंद करणे अनिवार्य नाही. परवान्याची प्रत (१ MB पेक्षा कमी ) अपलोड करावी. अर्जदारास केलेल्या अर्जाची पडताळणी करण्याकरीता स्क्रीनवर अर्ज उपलब्ध हाईल. अर्ज परिपुर्ण भरणा केला असल्यास अर्जदाराने मान्यता दयावी. अर्जामध्ये त्रुटी असल्यास अर्ज रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जदारास त्यांच्या अर्जाची स्थिती (STATUS) पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे..
काही प्रकरणात रिक्षाची नोंदणी रद्द करुन वाहन बदली आदेश प्राप्त करून घेतले असता अशा प्रकरणी संबंधीत अर्जदारांनी कार्यालयात अर्ज सादर करावा. याप्रकरणी एक वाहन नोंदणी प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती, परवाना, वाहन बदली आदेश आणि ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेचा कॅन्सल चेक इत्यादींच्या प्रती सादर कराव्यात.
अर्जदाराकडे आधार क्रमांक नाही अथवा कुठल्याही प्रकरणात अर्जदारास ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास अडचण येत असल्यास अशा सर्व प्रकरणामध्ये अर्जदारानी त्यांचे अर्ज कार्यालयामध्ये सादर करावेत.

ज्या परवान्यांची विधीग्राहयता दिनांक 16 डिसेंबर 2015 नंतर वैध आहे अशा सर्व परवानाधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे यांनी दिली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!