चिंचवड,दि.२३( punetoday9news):- सायकल वर स्वार होऊन खाकी वर्दीतील अधिकारी व कर्मचारी चिंचवड भागात रस्त्यावर उतरल्याचे पाहून नागरिक आवक झाले. स्मार्ट पोलीस स्टेशन व स्मार्ट पोलीस कर्मचारी ही संकल्पना राबविणाऱ्या आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सुरू केलेल्या उपक्रमात चिंचवड पोलिसांचा ताफा सायकल स्वारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या उपक्रमात आता पोलीस सायकल गस्त करणार असल्याने नागरिकांसाठी हा विषय चर्चेचा ठरत आहे.
शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्या नंतर नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या. पहिल्या दोन आयुक्तांची म्हणावी तशी छाप पडली नाही. मात्र आयर्न मॅन अशी ओळख असणाऱ्या कृष्ण प्रकाश यांनी विविध उपक्रम राबवित नागरिकांना आपलेसे केले. पोलिसांची कर्तव्य व समाजातील अस्मिता टिकविण्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. पोलीस यंत्रणा स्मार्ट करणारे हे उपक्रम आता नागरिकांच्या चर्चेचे ठरत आहेत.
परिसरात गस्त घालण्यासाठी पोलीस आता सायकल चा वापर करणार आहेत. या साठी चिंचवड पोलीस ठाण्यात आठ सायकल दाखल झाल्या आहेत.चिंचवड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरात सायकल वरून गस्त घातली.यांनी केलेल्या स्मार्ट सायकलिंग चा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
हद्दीत ज्या ठिकाणी मोठी वाहने अथवा दुचाकी घेऊन जाणे जिकरीचे होते अशा ठिकाणी सायकल स्वारी करत पोलीस गस्त करताना दिसणार आहेत.
नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आदर निर्माण व्हावा व भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे या संकल्पनेतून शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. पोलिसांना मदत म्हणून शेकडो सामाजिक कार्यकर्ते ग्राम सुरक्षा दलात सहभागी झाले आहेत. नागरिकांच्या सहकार्यातून भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे,पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना योग्य वागणूक मिळावी यासाठी स्वतः आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे, बाल गुन्हेगारी बाबत योग्य नियोजन करून त्यांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यक्रम सुरू आहेत.
विविध प्रकारातून भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरण निर्माण व्हावे हा उद्देश ठेऊन राबविले जाणारे उपक्रम कितपत पुढे जातील हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र शहरतील नागरीकांना हे उपक्रम औत्सुक्याचे वाटत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!