छत्तीसगड, दि.२४( punetoday9news):- सोशल मिडिया वर छत्तीसगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा युवकास मारहाण केल्याचा विडिओ चांगलाच गाजल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कारवाई करत पदावरून हटवले आहे. 

 

 

घटणेचा विडिओ वायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी माफी मागितली होती मात्र माफी मागताना युवकाने गैरवर्तन केल्याची माहिती दिली होती मात्र युवकाने प्रसारमाध्यमांसमोर येवून माहिती दिली त्यानुसार तो कुटुंबातील सदस्यास कोविड सेंटर ला जेवनाचा डबा देवून चालला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे डाॅक्टरांची चिठ्ठी सूद्धा होती त्याने माहिती दिली असतानाही छत्तीसगडच्या त्या पोलिसांनी मारहाण केली व जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल जमीनीवर आपटला.

संबंधित प्रकरणाचा विडिओ सोशल मिडिया वर प्रचंड वायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी माफी मागितली खरी मात्र मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे त्या स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!