बोपोडी, दि.२५(punetoday9news):- कोरोनाचा वाढता प्रसार व लसीची कमतरता पाहता बोपोडीतील नागरिकांना लसीकरणासाठी त्रास होत असुन बोपोडीमध्ये कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत लसीकरण केंद्रावर लसीची कमतरता जाणवत असल्याने जेष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी धावपळ करावी लागत आहे. बोपोडीत लसीकरण केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना लसीकरण सुलभ होवून लसीकरणाचे प्रमाण वाढेल या हेतूने महानगरपालिकेच्या शाळेत मनसेच्या बोपोडी शाखेतर्फे अंकित नाईक, शाखा अध्यक्ष यांनी सहाय्यक आयुक्त, औंध क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदनाद्वारे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments are closed