पुणे,दि.२६( punetoday9news):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी च्या मैदानी परीक्षेच्या गुण पध्दतीमधे महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

१) मैदानी परीक्षेचे गुण या पुढे केवळ Qualification साठी गृहीत धरले जातील आणि ते १०० पैकी ६० पेक्षा अधिक असणे अत्यावश्यक आहे. मैदानीला ६० पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांंनाच केवळ मुलाखत देता येणार आहे.अंतिम गुणवत्तायादी साठी मैदानीचे गुण मोजले जाणार नाहीत.(पुर्वी मुलाखतीसाठी मैदानी मधे १०० पैकी ५० गुण मिळवणे बंधनकारक होते आणि ते गुण अंतिम निकालासाठी गृहीत धरले गेले जात होते )

२) महिलांसाठी मैदाणी चाचणी मधे असणाऱ्या Events मधे देखील आयोगाकडुन बदल करण्यात आला आहे .
या पुर्वी
गोळा फेक २० गुण ,
धावणे २०० मीटर -४० गुण
चालणे (३ कि.मी.) -४० गुण
असे Events होते.

नवीन बदलानुसार
गोळाफेक -२० गुण
४०० मीटर धावने -५० गुण
लांब उडी -३० गुण असे १०० गुण असणार आहेत.

पुरुषांसाठी कोणतेही बदल नसुन पूर्वी प्रमाणेच Events आणि Event wise Marks चे Distribution असेल.
महिलांसाठी Marks चे Event wise Distribution आयोग यथावकाश घोषीत करण्यात येईल.

पुर्व ,मुख्य ला भरघोस गुण घेवुन ही कित्येक मुलांची संधी मैदानी मुळे हिरावली जात होती. मुख्य ला cutoff गुण घेणारे आणि मैदानीमधे १००/१००गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक ताकद मुख्य परीक्षे वेळीच लावावी लागणार आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!