पुणे,दि.२६( punetoday9news):- गिरिश कुबेर यांच्या “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाण केल्या बद्दल चंदननगर पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक होत नाही तो पर्यंत संभाजी ब्रिगेड लढा चालूच ठेवणार असल्याचे चंद्रशेखर घाडगे जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पुणे यांनी सांंगितले आहे
गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये केले असून यावर बंदी घातली पाहिजे.ही संभाजी ब्रिगेड ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी केली आहे, छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे,समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करणाऱ्या गिरीश कुबेर याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या संदर्भात चंदननगर पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, हनुमंत वाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष अशोक फजगे उपस्थित होते.
Comments are closed