दापोडी,दि.२६( punetoday9news):- विश्र्वाला अहिंसेचा व विज्ञानाचा मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त गोपाळ मोरे मित्र परिवाराच्या वतीने कोरोना संकटकाळात कष्टक-यांना दिलासा मिळावा या हेतूने परिसरातील कष्टकरी गरजूंना जिवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी गोपाळ मोरे म्हणाले, दापोडी भागात चाळी वस्तीत राहणारा कष्टकरी, मध्यमवर्गीय कोरोना संकटकाळात ब्रेक द चेन या मिनी लॉकडाऊन मध्ये पुरता बेजार झाला आहे. काम उद्योगधंदे बंद असल्याने समाजाची घडी विस्कळीत झाली आहे. कष्टकरी, मध्यमवर्गीय यांना दिलासा मिळावा या हेतूने सर्व खबरदारी घेत गेली दहा दिवसांपासून गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी ॲड.सुभाष हुलाकर,राहुल डंबाळकर, जन्नतबी सय्यद, बाळासाहेब जगदाळे, शिवाजी कोल्हे, कमलेश पिल्ले, दिलीप निकाळजे उपस्थित होते.
Comments are closed