पिंपरी,दि.२७( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे मंगळवार दि. 1 जूून रोजी महामंडळाच्या क्रीडा शिक्षकांनी 101 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.


गेली वर्षभर covid-19 मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन लेक्चरचे काम संभाळत राहिलेल्या वेळेचा सदुपयोग म्हणुन शहरातील क्रीडा शिक्षकांनी महामंडळाच्या माध्यमातुन शहरात अन्नदान उपक्रम राबवला असुन आता पावसाळ्याच्या सुरूवातीस झाडे लावण्याचा उपक्रम सर्व क्रीडा शिक्षकांनी हाती घेतला आहे. आज पर्यत विद्यार्थ्यी , संस्था व कंपन्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
महामंडाळाकडुन निसर्ग प्रेमी मंडळीना काही टिकाव व फावडे भेट देण्यात आले आहेत. तसेच झाडांना पाणी घालण्याकरिता 50 मीटर पाईप देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन महामंडळयाचे अध्यक्ष फिरोज शेख व संचालक निवृत्ती काळभोर यांनी केले .
तसेच कार्यक्रमाचे नियोजन महामंडाळाचे सचिव महादेव फपाळ , सुजाता चव्हाण, किर्ती मोटे, राम मुदगळ, उमा काळे, विष्णूपंत पाटील, संतोष म्हाञे , हर्षल कुलकर्णी, आशिष मालूसरे, अजंली वर्टी, अर्चना सावंत, हेमराज थापा, बाळासाहेब हेगडे, राजू माळी, ज्ञानेश्वरी लोखंडे, संपदा कुंजीर, मनोज काळे, लक्ष्मण सर, शारदा सस्ते, निळकंट कांबळे , राजेश प्रसाद, हर्षदा नळकांडे , सुनिल प्रसाद, गौरी उत्तरे, अभिषेक कदम, रामदास लांगी राहूल देवकर, गणेश गोंडे, मुकेश बिराजे, सुशिल जाधव, सागर रसाळ, स्वाती शिंदे , अमित पवार, प्रिया कांबळे, मनोज ठाकरे, राजेश शर्मा, रोहीत थापा, निलराज माने, शिवराज घोडके, अमृता तमुचे, मधूरा कुलकर्णी, या क्रीडा शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान व श्रमदान उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

सर्व सहभागी क्रीडा शिक्षकांचे महामंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!