पिंपरी, दि. २७( punetoday9news):-  चिखली येथील घरकुल वसाहत थोझ्या सखल भागांमध्ये असल्याने सोसायट्यांच्या तळमजल्यावर पाणी साचते . सध्या काही ठिकाणी सोसायटी परिसरामध्ये माती व राडारोडा दिसून येत आहे . तो त्वरित उचलण्यात यावा . ड्रेनेज व पावसाळी पाणी जाण्याच्या वाहिन्या या पावसाळ्या अगोदर साफसफाई करावी अशी मागणी अजय पाताडे, उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड भाजपा यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

या परिसरामध्ये पाणी तुंबून सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये पाणी साचून राहते यामुळे डासांचे प्रमाण वाढून परिसरामध्ये साथीचे रोग उद्भवतात सध्या कोरोनाच्या काळामध्ये रोगराई वाढू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे . सध्या लॉकडाऊन मुळे नागरिकांचे हाल झाले आहेत . त्यात आरोग्याच्या समस्या उद्भवु नयेत म्हणून येणाऱ्या पावसाआधी घरकुल परिसर स्वच्छ करून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा पद्धतीने सर्व वाहिन्या साफ कराव्यात व परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!