पिंपरी,दि.२७( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड वि आर देअर सोशल फौंडेशन आणि शांतिदुत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिर सावित्रीबाई फुले हॉल, यमुनानगर निगडी येथे संपन्न झाले. सध्या आपल्या देशात व राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असताना अनेक वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्याचप्रमाणे रक्तसाठाही कमी होत आहे.
रक्ताची कमतरता अनेक रुग्णालयात तसेच वैद्यकीय संस्थेत होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर एक महत्वाचे सामाजिक उपक्रम ठरले. या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी आपले रक्तदान केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य विठ्ठल जाधव, पिंपरी चिंचवड लोकमतचे संपादक हनुमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी व धीरेंद्र सेंगर यांची प्रमुख उपस्थित होती.
वि आर देअर सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा वृषाली प्रवीण व शांतिदुत परिवार निगडीचे अध्यक्ष व वि आर देअर सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष राहुल रांजणे यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले. तसेच यावेळी लॉकडाऊन काळात गरजू नागरिकांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टीकोनातून शहरातील १०० गरजू नागरिकांना जेवण देण्यात आले.

 

Comments are closed

error: Content is protected !!