• शामभाऊ जगताप युवा मंचचा अन्नदान उपक्रम.
पिंपळे गुरव,दि.२८(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे शाम जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील गरजुंना अन्नदान करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाने शहरात कष्टकरी, मजुर वर्गामध्ये मोठी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. हाताला काम नाही त्यात लाॅकडाउनची परिस्थिती त्यामुळे गरजवंताची मोठी संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे अशा गरजवंतांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित हिमांशू जगताप, कुणाल जाधव, शुभम पिंपळे, आकाश गायकवाड, सुहास महाडिक, अभि शिंदे, शामभाऊ जगताप युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.
Comments are closed