पिंपरी,दि.२८(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील मॉडर्न फ्रेंड सर्कल च्या वतीने गरजवंतांना अन्नदान करण्यात आले.
कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लोकांच्या रोज़गार व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात देत आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीतून आम्ही मॉडर्न फ्रेंड सर्कल च्या वतीने पिंपरी चिंचवड मध्ये आकुर्डी चौक, पिंपरी बस स्टॉप, चापेकर चौक चिंचवड, पिंपरी मार्केट तर पुणे शहरात रेल्वे स्टेशन, टिळक रोड, शनिवार वाडा, शनिपार, मार्केट यार्ड, अशा ठिकाणी गरजू लोकांना जेवणाचे डबे व फळवाटप करण्यात आले.
यावेळी सुशांत जावीर, शिवराज माळवतकर, रोहन चौगुले ,जय क्षीरसागर , कौतिक, रूपेश राऊत, अविनाश पाटील ,श्रेयस साळुंके, अनिकेत काची, अक्षय जाधव, क्षितिज तेली उपस्थित होते.
Comments are closed