पिंपरी,दि.२८( punetoday9news) :-  कोरोना परिस्थितीचा विचार करून सामाजिक दृष्टिकोनातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष शाम जगताप यांनी वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचा मदतनिधी सुपूर्द केला. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक नाना काटे, विद्यमान नगरसेवक मयूर कलाटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रशांत देवकाते, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, अक्षय जगताप, संकेत विधाते, अभिषेक काशीद, अमित जगताप आदी उपस्थित होते.

सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणे आवश्यक आहे. याची जाणीव ठेवून शाम जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मदतनिधी दिला आहे, असे शाम जगताप यांनी सांगितले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!