पिंपरी,दि. २९(punetoday9news):- राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे 30 मे, 31 मे व 1 जून असे तीन दिवस ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र घोडके यांनी दिली.
या व्याख्यानमालेत तीन दिवस संध्याकाळी पाच वाजता ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. यामध्ये 30 मे रोजी ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि आजची स्त्री’ या विषयावर कायद्याचे विद्यार्थी आनंद कांबळे आपले विचार व्यक्त करतील. 31 मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासन व्यवस्था’ या विषयावर बोलणार आहेत; तर 1 जून रोजी ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुरोगामी इतिहास’ या विषयावर युवा वक्ते निलेश वडीतके आपले विचार व्यक्त करणार आहेत. या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी श्रोत्यांनी fb.com/parivartanyuva/ आणि https://youtube.com/channel/UCuiLP8Ot6y4VtM7p0j5Xdlg या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed