पिंपरी,दि.३०(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ जयंतीनिमित्त ‘ज्ञात अज्ञात अहिल्या ‘ या विषयावर ३१ मे रोजी ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेश भागवत व निलिमा भागवत यांनी दिली.
या व्याख्यानमालेत ‘ज्ञात अज्ञात अहिल्या ‘ या विषयावर समृध्दी देवकाते यांचे ३१ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता युट्युब लाईव द्वारे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि आजची स्त्री तसेच आजच्या समाजातील ज्ञात अज्ञात अहिल्या या विषयावर माहिती दिली जाणार आहे. सांगवी परिसरातील नागरिकांना राजमाता अहिल्यादेेेेवी होळकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास व आदर्श या व्याख्यानाद्वारे अनुभवायला मिळणार आहे.
या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी श्रोत्यांनी https://youtube.com/c/omkarbhagwat या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed