दापोडी,दि.३१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे आरोग्य महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य निरीक्षक सुनील चव्हाण व गोपाळभाऊ मोरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस हार घालण्यात आला. यावेळी रिषिकेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी रमा बाराथे, शोभा नाईकनवरे, विमलताई, संगिता गायकवाड, रेखा गोहर, सुनिता जाधव, शालन पवार, कविता गायकवाड, अंजली जाधव, सुहासिनी गोसावी, संगीता बालसेन, जया धोत्रे, स्वाती शेवडे, जयदा शेख, कमल धर्मे, प्रभावती सुरूते, शिवशरण, महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बाईत यांनी केले व आभार प्रदर्शन बाळासाहेब जगदाळे यांनी केले.
Comments are closed