पुणे, दि.३१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येेेथील औंध रूग्णालयात जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर व कर्मचारी यांनी घेतली.
जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. बिलोलिकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे तसेच दंत विभाग प्रमुख डॉ. सुहासिनी घाणेकर, सायकॉलॉजिस्ट हनुमान हाडे, सामाजिक कार्यकर्त्त्या मोहिनी भोसले यांच्या उपस्थितीत तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.
राज्यात दर वर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त औंध रूग्णालयात तंबाखू विरोधी दिन कार्ययक्र घेण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed