पिंपरी,दि.३१( punetoday9news):- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत असणारे कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांच्या साठी काम करणारे कर्मचारी व शहरातील भुकेलेल्या व्यक्तींना निशुल्क भोजन व्यवस्था पिंपरी-चिंचवड शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.अडचणीत असलेल्या व्यक्तींना ही व्यवस्था आधार ठरत आहे. श्री महावीर अन्न छत्र नावाने सुरू असणाऱ्या या उपक्रमात दररोज दीड हजार व्यक्तींना भोजन सेवा देण्याचे कार्य सध्या सुरू आहे.

(फोटो – सकल जैन समाजाच्या वतीने शहरातील विविध भागात गरजूंना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे.)

कोरोनामुळे लॉक डाऊन लावण्यात आल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना ग्रस्त रुग्ण,त्यांचे नातेवाईक, सफाई कर्मचारी व शहरातील अनेक भुकेल्या नागरिकांना शुद्ध व सकस आहार निशुल्क देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्या पासून जैन समाजातील कार्यकर्ते विविध उपक्रमातून सामाजिक कार्यात व्यस्त झाले आहेत. अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना अत्यावश्यक वस्तू व भोजनाची व्यवस्था शहरातील विविध भागात करण्यात आली आहे.
सध्या शहरातील गरजूंना भोजन व्यवस्था देण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. कोणतीही व्यक्ती भुकेमुळे अडचणीत येऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संदीप कटारिया, संतोष लुंकड, भद्रेश शहा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सकल जैन समाजाने यासाठी सहकार्य केले आहे.

 


Comments are closed

error: Content is protected !!