पुणे,दि.१( punetoday9news):- सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून तात्काळ रद्द केला आहे .
या कारवाईमुळे बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे . त्यासाठी त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही . तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाही . त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही . यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही . या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही . आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे .
सध्या ही बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे . विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे.
बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे . पैसे थकवल्याने सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे
Comments are closed